कॉक्रोचना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे ऐकावे लागेल! उद्धव ठाकरे यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ पेपरफुटीने लाखो तरुण उद्ध्वस्त झाले आहेत. जंतरमंतरवर सुरू असलेले ‘कॉक्रोच’चे आंदोलन हा त्या पीडित तरुण-तरुणींचा आक्रोश आहे.  सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. त्यांना कमी लेखू नका,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला सुनावले. ‘ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही, असे ते म्हणाले.