एमपीएससीमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलेल्यांना खासगी नोकरीची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळणाऱया उमेदवारांना आता राज्य सरकारकडून खासगी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘प्रतिभा सेतू’च्या धर्तीवर राज्य सरकारने ‘एमपीएससी’साठी ‘निपूण सेतू’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अंतिम यादीत स्थान न मिळणाऱया उमेदवारांना आता खासगी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निपूण सेतूसंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.