
राज्यात विलंबाने दाखल झालेला मान्सून सुरुवातीच्या दिवसांत धुमशान घालणार आहे. पुढील दोन दिवसांत 25 जिह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यांमुळे काही भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याच अनुषंगाने 25 जिह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करतानाच संपूर्ण राज्याला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.




























































