
वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान धावणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन’ची प्रवासी संख्या 125 कोटींवर पोहोचली आहे. मेट्रो वनच्या सेवेची 12 वर्षे पूर्ण झाली असून पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगराच्या वेगवान कनेक्टिव्हीटीमुळे सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने रविवारी जाहीर केले. जून 2014 मध्ये सेवा सुरू झाल्यापासून मेट्रोवन ही सार्वजनिक वाहतुकीचे अत्यंत विश्वसनीय आणि पसंतीचे साधन बनल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला. मेट्रो वन मार्गिकेवर एका दिवसात 5.79 लाख प्रवाशांच्या प्रवासाची विक्रमी संख्या नोंदवली गेली असून 99.99% इतकी समयबद्धता राखत आतापर्यंत या मार्गिकेवर 15 लाखांहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.



























































