
फिश करी चांगली बनवली नाही म्हणून पती रागावला. यामुळे दुखावलेल्या गर्भवती महिलेने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कदायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेनदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यात ही घटना घडली. माधुरी विश्वकर्मा असे मयत पत्नीचे नाव असून ती पती तिलक नायक याच्यासोबत राहत होती. हे जोडपे मूळचे छत्तीसगडचे असून, रेशीम उद्योगात काम करण्यासाठी तामिळनाडूत आले होते.
तिलक नायक आणि माधुरी विश्वकर्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. माधुरी चार महिन्यांची गरोदर होती. फिश करीची चव न आवडल्याने तिलक माधुरीला रागावून निघून गेला. तिलक संध्याकाळी कामावरून घरी आला तेव्हा माधुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिलकने तात्काळ आपल्या मालकाला याची माहिती दिली. यानंतर पोलिसांना घनटेची माहिती देण्यात आली.


























































