
सोलापूरमधील बार्शी येथील एका मुख्याध्यापकाने शेअर बाजारात नुकसान झाल्याने पत्नी व मुलासह आत्महत्या केली आहे. शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे त्यांना 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. योगेश पाटील असे त्या मुख्यध्यापकांचं नाव आहे.
योगेश पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील शाळेत मुख्यध्यापक होते. शेअर बाजारात सतत नुकसान होत असल्यामुळे त्यांना कर्ज झालं होतं. त्यामुळे ते नैराश्यात होते.
योगेश पाटील हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या बार्शी तालुक्यातील हत्तीज गावी परत आले होते. शुक्रवारी त्यांनी पत्नी माधुरी व मुलगे अथर्व, शिवांश यांना जेवणातून विष देऊन आत्महत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेतला.





























































