होऊ द्या खर्च… मोदी आजपासून सहा दिवसांच्या विदेश टूरवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. ते 13 जून ते 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हाकियाचा दौरा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी दिली आहे. याआधी मोदींनी मागील महिन्यात 15 ते 20 मे असा सहा दिवसांचा यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा केला होता.

13 ते 14 जूनला मोदी फ्रान्सच्या नीस शहरात असतील. 14 ते 16 जूनपर्यंत स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर, 16 ते 17 जूनला एवियन आणि 17 ते 18 जूनला पॅरिसला जातील.

विदेश यात्रांवरचा खर्च

  • जपान – 17.19 कोटी
  • अमेरिका – 22.89 कोटी
  • इटली – 14.36 कोटी
  • अमेरिका – 15.33 कोटी
  • जपान – 10.74 कोटी
  • पोलँड – 10.10 कोटी
  • फ्रान्स – 8.33 कोटी

मोदींनी संपूर्ण जग पायाखाली घातले

पंतप्रधान झाल्यापासून विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या मोदी यांनी संपूर्ण जगाचा दौरा केला आहे. यामध्ये आफ्रिकी देश रवांडा, युगांडा आणि आता स्लोव्हाकिया यांसारखे छोटे देशही सोडले नाहीत. मोदी सर्वात जास्त अमेरिकेत गेले आहेत. मोदी यांनी तीन वर्षांत 38 विदेश दौरे केले असून यावर 258 कोटी रुपये खर्च झाले आहेत.