
आसामधील जोरहाट हवाई तळावर शनिवारी मोठी दुर्घटना घडली. हवाई दलाचे AN-32 हे विमान कोसळले. लँडिंगनंतर विमानात आग लागल्याने दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच हवाई तळावरील अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हवाई दलाने निवेदन जारी करत घटनेला दुजोरा दिला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जोरहाट हवाई तळावर उतरताना विमानात स्फोट झाला आणि आग लागली. विमानातील जवानांची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. भारतीय हवाई दलाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.




























































