जेद्दाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे कन्नूरला परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमधील कन्नूरहून जेद्दाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा कुन्नूरला माघारी वळवण्यात आले. विमान कुन्नूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान मंगळवारी सकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास केरळच्या कुन्नूर विमानतळावरून सौदी अरेबियाच्या दिशेने निघाले. उड्डाणानंतर सुमारे दोन तासांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सुरक्षेच्या नियमांचे पालन करत वैमानिकाने विमान माघारी वळवण्याचा निर्णय घेतला. कुन्नूर विमानतळावर विमान सुरक्षित उतरवण्यात आले.