FIFA World Cup 2026 आता जगानं मान्य करावं की मेस्सीच ‘महान’ खेळाडू, अल्जेरियाविरुद्धच्या हॅटट्रिकनंतर रोनाल्डोचे मोठे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

FIFA World Cup 2026 मधील अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात लिओनेल मेस्सीने हॅटट्रीक मारली. त्याच्या हॅटट्रिक जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच ख्रिस्तियानो रोनाल्डोने देखील त्याचा महान फुटबॉलपटू असा उल्लेख करत त्याचे कौतुक केले आहे. ‘आता संपूर्ण जगाने लिओनेल मेस्सी हाच फुटबॉल इतिहासातील महान खेळाडू (GOAT) आहे हे मान्य करावे’ असे म्हटले आहे.

‘आता जगाने लपाछपी थांबवून हे सत्य स्वीकारण्याची वेळ आली आहे की, मेस्सी हाच जगातील आजवरचा सर्वात सर्वोत्तम खेळाडू आहे. तो प्रत्येक हंगामात आणि विश्वचषकात सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत आला आहे, तरीही लोकांच्या मनात त्याच्याबद्दल शंका आहेत. ही एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक रात्र आहे, जी फुटबॉलच्या इतिहासात नेहमीच सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल”, असे रोनाल्डो म्हणाला.

लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कपमधील आपली पहिली हॅट्ट्रिक नोंदवत मिरोस्लाव क्लोसच्या कारकिर्दीतील वर्ल्ड कप गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. मेस्सीने सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांतच आपला इंटर मियामीमधील सहकारी रॉड्रिगो डी पॉल कडून मिळालेल्या सुंदर पासवर पहिला गोल केला, दुसरा गोल दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला केला, आणि तिसरा गोल मैदानातून बाहेर पडण्यापूर्वी काही क्षणांआधी केला; त्यावेळी संपूर्ण स्टेडियमने उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले.