Excellency-Excellency… म्हणत मोदी अक्षरशः ट्रम्पसमोर नतमस्तक! काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत केली टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जी-7 देशांच्या बैठकीसाठी फ्रान्समध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बुधवारी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी संवाद साधताना नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना सतत Excellency असे संबोधत होते. तर त्यांच्या सोबत असलेला टेलिप्रॉम्प्टर हा त्या ऐवजी मिस्टर प्रेसिडन्ट असा शब्द वापरत होता. या भेटीचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

”मोदीजी ट्रम्पसमोर ‘Excellency-Excellency’ म्हणत अक्षरशः नतमस्तक होत आहेत… आणि त्यांचे अनुवादक वारंवार दुरुस्ती करत ‘Mister President’ म्हणत आहेत. पण ‘Entire Political Science’ पदवीधारक विश्वगुरू मात्र Teleprompter नसल्यामुळे ‘चिठ्ठी’ वाचण्यातच जास्त व्यस्त दिसत आहेत”, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.