शेतकऱ्याचे मंत्रालयाजवळ झाडावर चढून आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी एका शेतकऱ्याने आज  मंत्रालय परिसरातील झाडावर चढून आंदोलन केले. या युवकाने गळफास बांधला. कर्जमाफीची मागणी करणारी पत्रके या युवकाने झाडावरून खाली फेकली आणि सुतळी बॉम्बही खाली फेकले. या आंदोलनामुळे या परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला होता.

शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळावी या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावली आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून तुपकर यांच्या समर्थनार्थ एका शेतकऱयाने मंत्रालय परिसरातील झाडावर चढून घोषणाबाजी केली. या युवकाकडे एक जाड दोरी आणि एका पिशवीत सुतळी बॉम्ब होते. या शेतकऱयाने सरसकट कर्जमाफीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातही आंदोलन केले.