
‘अहिल्यानगरकरांनी शिवसेनेला २५ वर्षे भरभरून प्रेम दिले. आजचा दिवस संघर्षाचा आहे. विकासाचा खोटा दिखावा उभा करून काही लोक नगरकरांना भ्रमित करत आहेत; पण अंधारातून घडवल्या जाणाऱ्या गोष्टी शहराची वाताहात करणाऱ्या आहेत. आम्ही शिवसेनेची पुन्हा मजबूत बांधणी करू. शिवसैनिक शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पाच हजार सदस्यांच्या नोंदणीसाठी काम करतील. मजबूत पक्षबांधणी करून अहिल्यानगरकरांच्या पाठिंब्याने आम्ही शहरावर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवू,’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त सदस्य नोंदणी अभियानाला किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतून प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, दीपक भोसले, उपशहरप्रमुख मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक आघाडीचे अनिस चुडीवाला, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, प्रतीक बारसे, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना घाटगे, शैला लांडे, विकेश गुंदेचा, बाळासाहेब जरे, सुजय लांडे, ऋतुराज आमले, शंकर आव्हाड, गणेश आपरे, राम धोत्रे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, महावीर मुथा, किशोर कोतकर, आप्पा लांडगे, विनोद शिरसाट, बाबासाहेब वैरागर, जयराम आखाडे, धनंजय देशमुख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, ‘आतापासूनच लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी करावी लागेल. पक्षबांधणीच्या माध्यमातून शिवसैनिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील.’
























































