Photo – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भांडुप घाटकोपर मधील शाखांना भेट, शिवसैनिकांमध्ये उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील भांडुप घाटकोपर मधील शाखांना भेट देत पक्षकार्याचा आढावा घेत निष्ठावंत शिवसैनिकांशी थेट संवाद साधला. घाटकोपर शिवसेना शाखा क्र. १२६ आणि भांडुप पश्चिम येथील शिवसेना शाखा क्र. ११४ ला दिलेल्या भेटींमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी खासदार संजय राऊत, पक्ष सचिव विनायक राऊत, आमदार सुनिल राऊत, विभाग क्रमांक ८ चे विभागप्रमुख तुकाराम पाटील, विभागप्रमुख रमेश कोरगावकर आणि विभागातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.