शिवसेनाप्रमुख हे एकच! उद्धव ठाकरेंनी ठणकावले, शिवसेनेचा पक्षप्रमुख उपरे ठरवू शकत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच होऊन गेले, पुन्हा दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी आणि भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा प्रमुख कोण, हे दिल्लीतून आलेले कोणतेही उपरे ठरू शकत नाहीत,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात आलेल्या भाजपच्या केंद्रीय नेत्याचा खरपूस समाचार घेतला. भांडुप येथील शाखा भेटीदरम्यान शिवसैनिकांना संबोधित करताना ते असे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “काल एक उपटसुंभ, उपरा कोल्हापूरमध्ये येऊन गेला. त्यांनी नवीन शोध लावला की शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेबांची आहे. पण त्या उपऱ्याला हे कळलं नाही की, त्याच्या स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष कोण आहे. कोणालाही उचलतात आणि खुर्चीवर बसवतात. अरे, तू उपरा आहेस, उपटसुंभ आहेस, तुझ्या अवकातीत राहा. आज खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे. म्हणून लोक तुला घाबरतात. पण मला कोणाच्या सुरक्षेची गरज नाही. जनता आणि आई जगदंबेचे सुरक्षा कवच माझ्यासोबत आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी परत एकदा त्या गद्दाराच्या आजोबाला सांगतो की, उपऱ्या शिवसेनेच नेतृत्व कोण करणार हे उपरे ठरू शकत नाही. तू उपरा आहेस. शिवसेना ही भूमिपुत्रांची आहे आणि ही शिवसैनिक ठरवतील तोच शिवसेनेचा पक्षप्रमुख होईल. शिवसेनाप्रमुख दुसरा होणे नाही, हिंदूहृदयसम्राट होणे तर अशक्य आहे. किती कोणी म्हटल तरी हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख दुसरा होणार नाही.