
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात रविवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर दोन बालके गंभीर जखमी झाली. विहामांडवा-डोणगाव रस्त्यावर चौंढाळा गावाजवळ रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
चौंढाळा (ता. पैठण) येथील पारधी वस्तीत राहणारे चव्हाण कुटुंबीय काही कामानिमित्त विहामांडवा येथे गेले होते. दिवसभराचे काम आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत होते. त्याचवेळी पाचोड येथील आठवडे बाजार आटोपून चिंचाळा गावाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने (क्र. एमच १७ के ९०७७) समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला. घटनास्थळी रक्त व हाडामांसाचा सडा पडला होता. मृतकांच्या नातेवाईकाच्या आक्रोशाने परिसर व ग्रामीण रुग्णालय दणाणून गेले. समोरील दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकजण हुंदके आवरू शकत नव्हता.
या भीषण अपघातात सिद्धार्थ भैय्या चव्हाण (३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (२७) आणि आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजना अभिषेक । पान ५
























































