
इराण आणि अमेरिकेमध्ये नुकताच शांतता करार झाला. त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या तोफा थंडावल्या. सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत असतानाच इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली. एकीकडे युद्धाचे ढग पुन्हा दाटू लागल्यानंतर दुसरीकडे शांतता करारांतर्गत अमेरिका-इराणच्या शिष्टमंडळात स्वित्झर्लंडमधील बर्गनस्टॉक रिसॉर्टवर चर्चा झाली. या चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीचे पडसाद उमटले.
इराणच्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत अमेरिकन शिष्टमंडळासोबतच्या फोटो सेशनवर बहिष्कार टाकला आणि बैठकीतून काढता पाय घेतला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर झालेला हाय-व्होल्टेज ड्रामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इस्लामाबाद सामंजस्य करारांतर्गत अमेरिका, इराण, पाकिस्तान आणि कतार यांच्यात चर्चेची पहिली फेरी रविवारी सुरू झाली चर्चा सुरू होण्यापूर्वी आयोजक आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाने दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये हस्तांदोलन आणि संयुक्त फोटो सेशनचे नियोजन केले होते. परंतु, अमेरिकेचा हा केवळ एक मीडिया शो असल्याचा आरोप करत इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद बगेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी या फोटो सेशनमध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला.
The Iranian delegation refused to take part in a planned handshake and joint photo-op with the U.S. delegation.
Source: Tasnim pic.twitter.com/Cgpz5LkGTO
— Clash Report (@clashreport) June 21, 2026
सोशल मीडियावर या हाय व्होल्टेज ट्राम्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी खोलीत प्रवेश केला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची गळाभेट घेत हस्तांदोलन केले. मात्र, त्यानंतर अराकची यांनी शरीफ यांच्या कानात काहीतरी पुटपुटले आणि क्षणार्धात संपूर्ण इराणी शिष्टमंडळासह ते खोलीबाहेर निघून गेले. इराणने घेतलेल्या निर्णयामुळे शाहबाज शरीफ थक्क झाले. त्यांनी बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडे पाहत हाताने इशाराही केला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अवघ्या काही फुटांवर उभे असलेले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्सही पाहत होते. अराकची बाहेर पडताच व्हान्स यांनी शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्याजवळ चर्चाही केली.
🚨📸 DIPLOMATIC MOMENT
🇵🇰 Pakistan’s Prime Minister was seen embracing Iranian Foreign Minister Abbas Araghchi just meters away from US Vice President JD Vance ahead of the latest round of negotiations.
The scene highlights Pakistan’s active diplomatic engagement as talks… pic.twitter.com/Y9zvwn1FVU
— DR ADNAN ALI (@DrMalko) June 21, 2026
वादाचे कारण काय?
इराणने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमागे डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक पोस्ट कारणीभूत ठरली. इराणने लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवाद्यांना तात्काळ रोखले पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही, तर आम्ही गेल्या आठवड्यापेक्षाही अधिक तीव्रतेने इराणवर हल्ला करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. यामुळे स्वित्झर्लंडमधील वातावरण तापले.
शांतता करार फसला तर होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांवर टोल लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
























































