विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त , रवींद्र सिंघल अॅण्टी करप्शन ब्युरोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र पोलीस दलात आज फेरबदल झाले. अपर पोलीस महासंचालक असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नागपूर पोलीस आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली आहे, तर नागपूरचे विद्यमान आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. राज्याच्या गृहविभागाने आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले.

पोलीस महासंचालक

  • संजय वर्मा- गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,
  • अर्चना त्यागी- न्यायिक व तांत्रिक. पोलीस महानिरीक्षक-
  • दत्तात्रय शिंदे- राज्य गुन्हे अभिलेख विभाग

पोलीस उपमहानिरीक्षक

  • संजय शिंत्रे- वसई-विरार, मीरा- भाईंदर (अपर पोलीस आयुक्त).
    उपायुक्त
  • प्रशांत मोहिते – डायल 112, नवी मुंबई z नीलेश रोहन – नांदेड (पोलीस अधीक्षक) z अभिनाश कुमार – पुणे शहर,
  • श्रेणिक लोढा – हिंगोली (पोलीस अधीक्षक)
  • रूपाली अंबुरे – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (पोलीस अधीक्षक) z शशिकांत सातव – छत्रपती संभाजीनगर शहर
  • रमेश धुमाळ – नागपूर शहर
  • पीयूष जगताप – खामगाव, बुलढाणा
  • नारायण शिरगांवकर – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19,
  • प्रांजली सोनावणे -अमरावती शहर.