
200 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँडरिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका जॅकलिन फर्नांडिस हिने मागे घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याच्या विनंतीनुसार, याचिका मागे घेण्यास व त्यासोबत आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याची मुभा दिली आहे. दिल्ली कोर्टाने जॅकलिन, ठग सुकेश चंद्रशेखर आणि इतर 15 जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.




























































