
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा सध्या चर्चेत असून याची व्याप्तीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये आणि आभूषणांच्या नोंदी गायब असल्याचे समोर आल्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दान केलेली वीटही गायब आहे. या संदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक खळबळजनक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
“Serious questions over the missing 4 kg silver brick donated by Shiv Sena for the Ram Mandir construction in Ayodhya.
Uddhav Thackeray ji had generously contributed ₹1 crore + this sacred silver brick in the presence of thousands of Shiv Sainiks & saints. Yet, years later, no… pic.twitter.com/fy1HoTTg3n— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2026
200 किलोंच्या विटाही गायब?
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाने एक-एक किलो वजनाच्या 200 विटा दान केल्या होत्या. 2021 मध्ये या विटा दान करण्यात आल्या होत्या. राम मंदिराचे ट्रस्टी चंपत राय यांच्याकडे या विटा सोपवण्यात आल्या होत्या. मात्र त्याची पोचपावती अद्याप देण्यात आलेली नाही, अशी माहिती विश्व सिंधी सेवा संगमचे राजू मकवानी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
8 जणांना अटक
राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष, करुणेश आणि लवकुश मिश्रा या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ayodhya Ram Temple राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी आठ जणांना अटक




























































