
सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुलाम झाले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची ‘छी-थू’ होत असून देशाला आर्थिकदृष्ट्या गुलाम करण्याची परिस्थिती आता सुरू झाली आहे. राजकीय व्यवस्थेला लकवा लागला असेल तर लोकांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा, असे ते म्हणाले.






























































