रत्नागिरीत भीषण अपघात, दोन एसटी बस एकमेकांना धडकल्या; शालेय विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवळे पवार कोंड येथे गुरूवारी 2 जुलै रोजी भीषण अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास दोन एसटी बस एकमेकांना धडकल्या. या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एकाच्या डोक्याला आणि हनुवटीला मार लागला आहे.

भावे आडोम कडून रत्नागिरीला येणाऱ्या बसची शीळच्या दिशेने जाणाऱ्या बसला धडक बसली.धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.