
कर्नाटकातील बंगळुरू दक्षिण परिसरात गुरुवारी सकाळी दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून दरड कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण बिहारमधील मजूर होते. अपघातावेळी या खाणीत जवळपास 18 मजूर काम करत होते. सर्व मृत रोजंदारी मजूर होते आणि स्टोन क्रशर साइटवर काम करत होते.




























































