
गडचिरोली महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटरमुळे एका सर्वसामान्य व्यक्तीला अवघ्या एका महिन्याचे वीज बिल तब्बल 4 लाख रुपये आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देसाईगंज तालुक्यातील रामदास ठाकरे असे या ग्राहकाचे नाव आहे. ठाकरे यांना दर महिन्याला अवघे एक ते दीड हजार रुपये वीज बिल येत असताना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर या ग्राहकाला 4 लाख 79 हजार 60 हजार रुपयांचे वीज बिल हातात पडल्यानंतर या व्यक्तीचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. एकीकडे स्मार्ट मीटरवरून विरोध होत असताना या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर हा प्रकार समोर आल्यानंतर गडचिरोली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱयांची कानउघाडणी करत वीज बिलात दुरुस्ती करण्यास सांगितले. यानंतर रामदास ठाकरे यांना सुधारित 3 हजार 560 रुपयांचे नवे वीज बिल देण्यात आले. केवळ तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता एच.पी. पारेख यांनी म्हटले आहे.




























































