उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक अत्यवस्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तशर्करेची पातळी कमी झाली असून त्यांना प्रचंड थकवा जाणवत असल्याची माहिती त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले. सहाव्या दिवशी त्यांच्या रक्तशर्करेची पातळी 61एमजी/डीएल एवढी होती, तर रक्तदाब 110/75 एमएमएचजी एवढा होता. सोनम यांची प्रकृती तासागणिक खालावत असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले.

सहा विद्यार्थ्यांचेही उपोषण

जंतरमंतर येथेच वेगळ्या व्यासपीठावरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनीही उपोषण सुरू केले आहे. त्याच्यापैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तशर्करेची पातळी कमी झाली असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.