पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम; मुंबईला ‘ऑरेंज’ तर रायगडला ‘रेड अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात हवामान प्रणालीची तीव्रता वाढल्याने राज्यांत सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरला सोमवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे, तर रायगडला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. 8 जुलैनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.

मागील चोवीस तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टी, पुणे घाट विभागात 200 मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. 2 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता त्याची तीव्रता वाढताना दिसत आहे. ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राहून अधिक तीव्र हवामान प्रणाली असते. या स्थितीत वाऱयाचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही अधिक होते. त्यामुळे मान्सूनची स्थिती सध्या चांगली आहे, असे हवामानतज्ञांचे मत आहे.