
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आणि दहशतवादी शहजाद भट्टी नेटवर्कच्या दोन मॉड्यूल्सचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत एक दहशतवादी मॉड्यूल आणि अवैध शस्त्र तस्करी मॉड्यूल उघडकीस आले आहे. विशेष पथकाने दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या कारवाईत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून अनेक पिस्तूल आणि पेट्रोल बॉम्ब जप्त केले आहेत. रांचीमधील आरएसएसच्या कार्यालयातही पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे आणि या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयएसआय आणि दहशतवादी शहजाद भट्टी नेटवर्कवर मोठी कारवाई सुरू केली आहे. दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.



























































