
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही बसला. जोरदार वाऱ्यांमुळे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या सजावटीतील पत्रे उडून गेली. त्यानंतर रात्री उशिरा स्थानकाच्या छताचा सुमारे 50 ते 60 फूट भाग कोसळल्याची घटना घडली.
सुदैवाने घटना घडली त्यावेळी स्थानक परिसरात प्रवासी आणि वाहनांची वर्दळ अत्यल्प होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. दरम्यान, गेल्याच वर्षी या छतामध्ये गळती होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतरही आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल योग्य प्रकारे झाली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Ratnagiri, Maharashtra: Heavy rain and strong winds caused a 50–60-foot section of the roof at Ratnagiri railway station to collapse late at night.
No casualties were reported as vehicular and passenger movement was minimal at the time. The incident has raised concerns, as the… pic.twitter.com/Om5cJXCOu9
— IANS (@ians_india) July 6, 2026





























































