Dapoli News – दाभोळ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील दाभोळ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राकेश कृष्णा फणसकर वय 40 वर्ष राहणार ढोरसई साई मंदिराजवळ दाभोळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राकेश फणसकर यांनी जून 2025 मध्ये मंदिराजवळील जंगलमय भागात पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यातून सदर मुलगी गरोदर राहिल्याचे पुढे आले. याप्रकरणी फणस्कर याच्यावर दाभोळ पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(1), 64(2) (M) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.