
विद्याविहार येथील उड्डाणपूल दिनांक 31 ऑगस्ट 2026 तर मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या दोन्ही आर्मचे काम 31 मे 2027पर्यंत पूर्ण करावे. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वापरून निर्धारित कालावधीत पुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मानखुर्द-महाराष्ट्र नगर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाच्या कामांचा आज बांगर यांनी भेट देऊन आढावा घेतला. मानखुर्द-महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमित सकाळी आणि रात्री मोठय़ा स्वरूपात वाहतूक काsंडी होते. परिणामी मुंबईवरून वाशीकडे तसेच वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक काsंडीचा मोठय़ा स्वरूपात सामना करावा लागतो. यासोबतच घाटकोपर ते मानखुर्द आणि मानखुर्द ते घाटकोपर या मार्गावर वाहतूक काsंडी निर्माण होते. यावर परिणामकारक उपाय म्हणून पालिकेने घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावरून थेट वाशीकडे जाणारा आर्म-1 आणि सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपूल येथून घाटकोपरकडे जाणारा आर्म-2 उड्डाणपूल अशी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
असा आहे विद्याविहार उड्डाणपूल
लालबहादूर शास्त्राr मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एपूण दोन मार्गिकांचा आहे. एपूण 650 मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर 100 मीटर पूल, तर पूर्व बाजूस 220 मीटर आणि पश्चिम बाजूला 330 मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गदेखील दिला जात आहे. सद्यस्थितीत विद्याविहार उड्डाणपुलाचे काम सुमारे 80 टक्के झाले आहे.
असा आहे मानखुर्द – महाराष्ट्र नगर उड्डाणपूल
आर्म-1 हा घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग उड्डाणपुलावरून वाशीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र दोन-लेनचा, 1,420 मीटर लांबीचा व 8.5 मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध करून देणार आहे.
आर्म – 2 हा वाशीकडून येणाऱ्या वाहनांना विद्यमान घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग उड्डाणपुलावर जाण्यासाठी दुसऱ्या स्तरावरील स्वतंत्र दोन-लेनचा 1,951 मीटर लांबीचा व 8.5 मीटर रुंदीचा उड्डाणपूल उपलब्ध करून देणार आहे.



























































