
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन प्रवासादरम्यान आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभ्या असलेल्या एका एसी लोकलचा एसी तब्बल 15 मिनिटांपासून बंद पडल्याची घटना घडली. अचानक एसी बंद झाल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. एसाी लोकलचे डबे पूर्णपणे बंद असल्यामुळे काही वेळातच अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ लागला.
Mumbai – Commuters on Platform No. 2 at Mulund railway station faced severe discomfort when the AC in a local train stopped working for nearly 15 minutes.Passengers reported difficulty in breathing due to the sudden rise in temperature inside the coach.Several women passengers… pic.twitter.com/HMn54MDY0W
— NextMinute News (@nextminutenews7) July 13, 2026
या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एसी लोकलमध्ये एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हवेच्या कमतरतेमुळे आणि श्वास कोंडल्यामुळे ट्रेनमधील काही महिला प्रवासी जागीच बेशुद्ध पडल्या. महिला बेशुद्ध पडल्याचे पाहताच डब्यातील इतर सहप्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराविरोधात संतप्त प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
























































