
अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या आठवड्यापासून तणाव वाढत आहे. आखाती देशात वाढणाऱ्या तणावाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. या वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोने-चांदीतही मोठी घसरण झाली असून रुपयाही कमकुवत झाला आहे.
देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. आखाती देशातील वाढत्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांकही १५० हून अधिक अंकांनी घसरला. मात्र, मोठ्या घसरणीनंतर बाजार सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारच्या सत्रात अनेक शेअर ग्रीन झोनमध्ये आले होते. मात्र, सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
आखाती देशातील वाढत्या संघर्षामुळे सोमवारी आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांकही १५० हून अधिक अंकांनी घसरला. तर दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास निफ्टीने रिकव्हरी करत 11.10 अंकांची म्हणजेच 0.05% वाढ नोंदवत 24,218 . 00 वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स 75.62 अंकांची म्हणजेच 0.10% वाढ नोंदवत 77,645.01 वर व्यवहार करत होता.
या घडामोंडीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत ०.४% घसरणीसह ९५.७०५० वर उघडला. मागील सत्रात तो ९५.३२५० वर बंद झाला होता. त्यामुळे रुपयाही कमकुवत झाला आहे. सोमवारी रुपया ९५.३२५० च्या मागील बंद भावाच्या तुलनेत ०.४% घसरणीसह ९५.७०५० वर उघडला. यूएस ट्रेझरी यील्ड्समधील वाढीमुळे रुपया आणखी कमकुवत होत आहे.
याचा परिणाम वायदे बाजारावारही दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती 70 डॉलरचा टप्पा ओलांडला असून त्या सध्या 75 डॉलवरवर व्यवहार करत आहेत. तर सोन्याच्या दरात 1278 रुपयांचा घसरण झाली असून तो 142200 वर व्यवहार करत आहे. तर चांदी 3235 ची घसरण होत 219429 वर व्यवहार करत आहे.

























































