
श्री बद्रीनाथ मंदिरातील देणग्यांच्या व्यवहारात घोटाळा केल्याच्या आरोपाखाली उत्तराखंड पोलिसांनी आरोपी प्रमोद नौटियाल याला देहरादून येथील राहत्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
चमोली पोलिसांनी रविवारी रात्री नौटियाल याला अटक केली असून त्याला बद्रीनाथ येथे नेण्यात आले आहे, जिथे सध्या त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती चमोलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) सुरजित सिंग पनवार यांनी दिली.
अटक करण्यात आलेला प्रमोद नौटियाल हा ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचा’ (BKTC) निलंबित कर्मचारी आहे. मंदिर समितीने यापूर्वीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती, त्यानंतर आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तराखंड पोलिसांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निलंबित बीकेटीसी कर्मचारी प्रमोद नौटियाल देणगी मोजणी कक्षातून संशयास्पद पद्धतीने रोख रक्कम गोळा करताना दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये तो 500 आणि 100 रुपयांच्या नोटांची बंडले, सोने-चांदीची नाणी, शालिग्राम आणि देणगीची पाकिटे लपवत किंवा चोरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आ
























































