अमेरिकेकडून इराणची पुन्हा नाकेबंदी; होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवरील हल्ल्यांनंतर घेतला मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
iran-attacks-us-military-bases-in-bahrain-and-kuwait-after-us-blockade-strait-of-hormuz-tension

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने कारवाई केली आहे. बुधवारी पहाटे बहरीन आणि कुवेत या दोन्ही देशांमध्ये हल्ले झाल्याचे वृत्त पीटीआयने स्थानिक माध्यमांच्या आधारे दिले आहे. इराणला रोखण्यासाठी अमेरिकेकडून पुन्हा एकदा नाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या नाकेबंदीच्या निर्णयानंतर इराण आणखी आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बहरीनमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले, तर कुवेतच्या लष्कराने येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडण्यासाठी त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले.

या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव वाढत असताना इराणकडून त्यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे.