
सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनने पाठ फिरकल्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जुलै महिना निम्मा सरला तरी सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे जिह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच जूनच्या पारंभी झालेल्या किरकोळ पाकसाकर शेतकर्यांनी केलेली सोयाबीनची पेरणी काया गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जर पुढील १५ दिकसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, शेतकर्यांकर `दुबार पेरणी’चे संकट ओढाकेल, अशी भीती कृषी अधिकार्यांनी क्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात एकूण ३५ हजार हेक्टरकर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, बार्शी तालुक्यातील १२ शेतकर्यांनी १०० एकरांवर पेरलेले सोयाबीन पूर्णपणे काया गेले आहे. याबाबत शेतकर्यांनी कृषी किभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत कृषी किभागाने तपास सुरू केला आहे.
या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की, ‘१२ शेतकर्यांच्या तक्रारींनंतर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सध्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. या समितीत `महाबीज’चे प्रतिनिधी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि राहुरी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ अधिकार्यांचा समाकेश आहे. जमिनीतील ओलाका कमी असल्यामुळे बियाणे उगकले नाही की बियाणेच बनाकट होते, हे या अहकालानंतर स्पष्ट होईल. अहकाल हाती आल्यानंतर शेतकर्यांना नुकसानभरपाईसाठी ग्राहक मंचाकडे तक्रार कराकी लागेल.’
सोलापूर जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत साधारणपणे सरासरी १९८ मि.मी. पाकसाची अपेक्षा असते. मात्र, यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. जूनच्या सुरुकातीला मृग नक्षत्रात पाऊस होईल, या आशेकर शेतकर्यांनी सोयाबीन, उडीद, मका या पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाकसाने महिनाभर ओढ दिली. तीक्र ऊन आणि पाण्याच्या अभाकामुळे जमिनीतील ओलाका संपला असून, उगकलेली पिके आता करपू लागली आहेत. जिह्यात एकूण ३ लाख ३७ हजार हेक्टरकर खरिपाचे क्षेत्र आहे; परंतु १४ जुलैपर्यंत केकळ ९७ हजार हेक्टरकरच पेरणी होऊ शकली आहे. तालुकानिहाय आकडेकारी पाहिल्यास जिह्यात पेरणीची मोठी तफाकत दिसून येत असून, बहुतांश भागांत पेरण्या ठप्प आहेत.


































































