
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा हिने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत दिविजाने म्हटलंय, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा, या दोन्ही गोष्टींना परवानगी मिळता कामा नये. तुम्ही शैक्षणिक सुधारणांच्या चळवळीला पाठिंबा देऊ शकता, परंतु त्या चळवळीचे नेतृत्व करणाऱया राजकीय पक्षाला आणि त्यांच्या विचारसरणीला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका.





























































