
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रत्येक दिवस यशदायी
शुक्र राश्यांतर, सप्ताहाच्या प्रत्येक दिवस यशदायी ठरवता येईल. जिद्द, मेहनत, सहनशीलता ठेवा. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. धंद्यात हलगर्जीपणा नको. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. शुभ दि. 26, 29
वृषभ – राग नियंत्रणात ठेवा
शुक्र राश्यांतर, गुरूपौर्णिमेपासून कार्याला अधिक वेग प्राप्त होईल. रागाचा पारा वाढवू नका. मेहनत घ्या. संधीचा उपयोग करा. प्रगती साधा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. सावध रहा. शुभ दि. 29, 30
मिथुन – कामाचे कौतुक होईल
शुक्र राश्यांतर, तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. गुरूपौर्णिमेच्या दिवशी वाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. शुभ दि. 26, 31
कर्क – विचारपूर्वक भाष्य करा
शुक्र राश्यांतर, तुमच्या क्षेत्रात प्रगतीचे मार्ग समोर असले तरी विचारपूर्वक भाष्य करा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. नोकरीत कामाचा व्याप राहील. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण होण्याकडे लक्ष द्या. शुभ दि. 29, 30
सिंह – सौम्य धोरण ठेवा
शुक्र राश्यांतर. तुमच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सौम्य धोरण ठेवा. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात अरेरावी नको. परिचय उत्साहवर्धक वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना मिळेल. शुभ दि. 31, 1
कन्या – कामाला आरंभ करा
शुक्र राश्यांतर. सप्ताहाच्या सुरूवातीपासून कामाला आरंभ करा. चांगले यश मिळेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. आर्थिक व्यवहारात फसगत टाळा. ओळखींवर विसंबून राहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कसरत होईल. शुभ दि. 29, 30
तूळ – प्रकृतीची काळजी घ्या
शुक्र राश्यांतर, महत्त्वाची कामे करा. प्रकृतीची काळजी घ्या. संयम ठेवा. धावपळ टाळा. यश मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. वाहनाचा वेग कमी ठेवा. चौफेर लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य कराल. शुभ दि. 26, 27
वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी राखा
शुक्र राश्यांतर. कठोर भाष्य कामात अडथळा निर्माण करेल. वाद न वाढवता यश मिळवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंद्यात पर्याय निवडता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आश्वासन महत्त्वाचे ठरेल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 26, 29
धनु – नोकरीत चातुर्य वापरा
शुक्र राश्यांतर, ठरवाल ते करून दाखवाल मात्र अहंकार दूर ठेवा. सहकारी, मित्र यांचे साहाय्य मिळेल. नोकरीत चातुर्य वापरा. धंद्यात वाढ होईल. शत्रुत्व दूर इsवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. योग्य शब्दात प्रतिक्रिया द्या. शुभ दि. 29, 31
मकर – नोकरीत व्याप राहील
शुक्र राश्यांतर, तुमच्या निर्णयाची दिशा योग्य असली तरी निष्कारण टिका होईल. संयम ठेवा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नवीन परिचयावर भाळू नका. नोकरीत व्याप राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. धंद्यात हिशेब तपासा. शुभ दि. 31, 1
कुंभ – अहंकार दूर ठेवा
शुक्र राश्यांतर, गोड बोलून तुमच्या मनातील गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. वाद, तणाव टाळा. अहंकाराने नुकसान होईल. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्टवक्तेपणाने नुकसान होईल. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 26, 27
मीन – अनाठायी खर्च टाळा
शुक्र राश्यांतर. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. अनाठायी खर्च टाळा. बोलण्यात संयम ठेवा. नोकरीत कामाचा व्याप राहील. क्षुल्लक अडचण तापदायक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी वर्गाचे वोगणे मनस्ताप देणारे वाटेल. शुभ दि. 26, 29























































