
जेन जी (Gen Z) युवा हिंदुस्थानी सब-जूनियर पुरुष संघाने FIH यूथ हॉकी5s एशियन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रुबाबदार कामगिरी करत पाकिस्तानचा 3-1 असा फडशा पाडला. मस्कट येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच वर्चस्व पाहायला मिळालं. तरुण खेळाडूंनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघाने एलिट पूल टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले असून, दोन्ही संघांनी FIH यूथ हॉकी5s वर्ल्ड कपसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
या अंतिम सामन्यात हिंदुस्थानकडून रोमित पालने 5 व्या मिनिटाला, कर्णधार केतन कुशवाहने 13 व्या मिनिटाला आणि शाहरुख अलीने 13 व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानतर्फे 16 व्या मिनिटाला मोहम्मद उस्मानने एकमेव गोल केला, मात्र तरुण हिंदुस्थानी खेळाडूंच्या भक्कम बचावामुळे त्यांना सामन्यात पुनरागमन करता आले नाही. याआधीही हिंदुस्थानने पाकिस्तानचा 7-3 असा पराभव केला होता. या ऐतिहासिक विजयानंतर हॉकी इंडियाने जेन जी पिढीच्या या होतकरू युवा खेळाडूंसाठी नकद पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच, चीनविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या हिंदुस्थानी महिला संघासाठीही, प्रत्येक खेळाडूला 1 लाख आणि सपोर्ट स्टाफला 50 हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
From dreams to the podium. 🥇🇮🇳
These medals represent countless hours of dedication, teamwork, and belief. A proud moment as our Men’s Youth Hockey5s team were crowned Asian Champions in Muscat. 💙
The journey continues at the inaugural FIH Youth Hockey5s World Cup 2026. 🌍🏑… pic.twitter.com/blAqShjn2Q
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2026























































