दर्शनाला चाललेल्या भाविकांची कार तलावात कोसळली, पाच जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाटू श्याम दर्शनाला चाललेल्या भाविकांची कार तलावात उलटल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात ही घटना घडली. अरंडिया गावातील पाच जण खाटू श्याम दर्शनासाठी निघाले होते. मात्र राजगढ जिल्ह्यातील भीलखेडीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार तलावात कोसळली. ग्रामस्थांनी कारमधील पाचही जणांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.