हे करून पहा – भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फार वेळ पाण्यात राहिल्याने पायाला भेगा पडतात. त्यासाठी पायांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. एका भांडय़ात 3 ते 4 चमचे मध, 2 ते 3 चमचे कच्चे दूध घालून चांगले मिसळा आणि पायाच्या टाचांवर लावा. किमान 30 मिनिटे असेच राहू द्या. पाणी लावून टाचा स्वच्छ करा.

कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या. यानंतर तळव्यावर कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा. सुती मोजे घाला आणि झोपा. सकाळी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.