
शासकीय रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळकून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. आता शासकीय रुग्णालयातील दोन लिपिकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
45 टक्के अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे मिळकण्यासाठी आरोपींनी बनाकट पत्ते आणि खोटे आधारकार्ड तयार केले होते. या बनाकट कागदपत्रांच्या आधारे शासकीय रुग्णालयातून अपंगत्वाचे दाखले लाटण्यात आले. या प्रकरणात शिक्षक विजय गर्जे (रा. अहिल्यानगर), राजेश जाधव (कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे किभाग), महेश बारगज, रमेश ढकण या चार आरोपींना अटक करण्यात आली. आता या संपूर्ण घोटाळ्यात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सागर राजपूत (करिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय), कसीम खान (कनिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय) या दोन्ही लिपिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
दिव्यांग संघटनांनी याप्रकरणी संशय क्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. समितीच्या चौकशीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. जयकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या कारकाईमुळे शासकीय यंत्रणेत बनाकट प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.



























































