
पालकांनी मोबाईल ठेवून गृहपाठ करण्यास सांगितल्याने सातवीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कदायक घटना गुजरातमध्ये घडली. सूरतच्या वड रोडवरील लक्ष्मीनगर सोसायटीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत विद्यार्थ्याचे कुटुंब मूळचे ओडिशाचे असून कामानिमित्त सूरतमध्ये राहत होते. मुलाचे वडील एका हातमाग कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. तर मृत विद्यार्थी सूरत महापालिकेच्या शाळेत सातवी इयत्तेत शिकत होता. सूरजला मोबाईल गेमिंगचे व्यसन होते.
घटनेच्या दिवशी आई-वडिलांनी सूरजला मोबाईल बंद करून शाळेचा गृहपाठ करण्यास सांगितले. यामुळे रागाच्या भरात सूरज आपल्या खोलीत गेला आणि स्कार्फने छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला.

























































