Photo – तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी उद्घाटन केलेला गडचिरोलीत पूल वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीत तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलेल्या कोठी-कोरणार पूलाचा काही भाग पावसामुळे वाहून गेला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला हा पूल वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

इतक्या हलक्या दर्जाचा पूल बनवण्यात आल्याने नागरिकांमध्ये झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यावेळचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन झाले होते