मुंबईतील 2,640 घरांसाठी आज सोडत, एका घरासाठी 28 जणांमध्ये चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या, गुरुवारी म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांसाठी संगणकीय सोडत निघणार आहे. दुपारी 12 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीसाठी 75,127 अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी 28.54 अर्ज प्राप्त झाले आहेत.

म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर, वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांचा समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 856, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 841 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाचे यूटय़ूब चॅनेल @mhadaofficial व फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीचा निकाल तत्काळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.