
गेल्या आठवड्यात राज्यभर धुमशान घालणारा पाऊस पुन्हा राज्याच्या अनेक भागांत जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the ghat areas of Madhya Maharashtra.
Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 6, 2026
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rainfall, gusty winds reaching 30-40 kmph very likly to occur at isolated places in the districts of Marathwada. pic.twitter.com/Tc4P6VWgDh
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 6, 2026




























































