
पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे शनिवारी जम्मूवरून होणारी अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. जम्मू भागात 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढची स्थिती आणि हवामान पाहून अमरनाथला जाणाऱया भाविकांच्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.


























































