
तब्बल तीन महिन्यांनंतर रायगडातील मच्छीमारी सुरू झाली आहे. त्यासाठी बोटीमध्ये बर्फाचा साठा ठेवावा लागतो. पण बोटीवर बर्फ टाकण्यासाठी मुरुडमध्ये जेट्टीच नसल्याने एकदरा पुलावरून कसरत करत हा बर्फ बोटीवर न्यावा लागतो. त्यामुळे बराच वेळदेखील जातो. या भागात कोणतीही सुविधा नसल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसत असून लवकरात लवकर जेट्टी व बर्फ फॅक्टरी उभारावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.



























































