शेतकऱ्यांना कर्जाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पुढील वर्षापर्यंत सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पुढील वर्षापर्यंत राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.