
आसाममध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 100 जणांचा जीव गेला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. येथील पुराची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या पावसात आसाममध्ये भयंकर पूर आला. या पुराचा फटका 1 लाख 47 हजार लोकांना बसला. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. लोकांना घर सोडून छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. गेल्या अडीच महिन्यांत झालेल्या पावसाने 99 हजार लोकांचा बळी घेतला आहे.
पुराच्या विळख्यात 12 जिल्हे
सतत कोसळणाऱया पावसामुळे आसाममध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. येथील तब्बल 12 जिह्यांना पुराचा विळखा बसला आहे. सोनितपूर, नागाव, गोलाघाट, शिवसागर, होजाई, दरांग, जोरहाट, चराईदेव, कार्बी आंगलोंग, लखीमपूर व विश्वनाथ या जिह्यांतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.




























































