
पाकव्याप्त कश्मीरमध्ये सोमवार १० ऑगस्ट रोजी होणारे विधानसभेचे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. हिंसाचार आणि सततच्या निदर्शनांमुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात हिंसाचार उसळला होतासुरक्ष दलांनी निदर्शकांवर गोळीबार देखील केला होता. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला होता. हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये होण्प्रया या निवडणुका मान्य करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान या निवडणुकांच्या माध्यमातून पाकव्याप्त कश्मीरवरील आपला अवैध ताबा लपवण्याचा आणि तेथे होण्प्रया मानवाधिकार उल्लंघनांवरून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदुस्थानच्या पररष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
























































